Sports academy मानवाचे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठीच्या शिक्षण प्रक्रियेस शारीरिक शिक्षण म्हणतात. या शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त योग, प्राणायाम, व्यायाम, विविध खेळ आणि ध्यान यांसारख्या क्रिया समाविष्ट असतात. या शिक्षणामध्ये स्वच्छता व निटनेटकेपणा आणि वक्तशीरपणा या प्रक्रियांनाही महत्त्व आहे. विद्यार्थ्याला निरोगी शरीर, मन आणि आचरण यांकरिता प्रशिक्षण देणे; निरोगी शरीरात निरोगी मन ठेवण्यासाठी विद्यार्थ्याला नियमित शारीरिक व्यायामाची सवय लावणे ही शारीरिक शिक्षणाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
यामुळे ते शिस्त व आज्ञाधारकपणा या गोष्टी शिकतात.
शारीरिक शिक्षणामुळे खेळाडू एखाद्या संघिक खेळामध्ये निष्ठा राखण्यास शिकतात आणि इतर संघांचा सन्मान करण्यास शिकतात.
समर्थन आणि संयम यांचा विकास होतो.
फायदे : शारीरिक शिक्षणाचे मन आणि शरीरासाठी अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत.
शारीरिक शिक्षणामुळे शरीरास मजबूत, निरोगी आणि सुंदर बनविते.
शाळांमध्ये मानसिक कार्यानंतर विद्यार्थ्यांना सामान्यत: नैराश्य जाणवते, खेळांमुळे मुले मोकळ्या हवेमध्ये श्वास घेतात आणि मैदानावरील खेळांमुळे उत्साही असतात.
शारीरिक शिक्षणामुळे चिंतन व स्मरणशक्ती वाढते.
शारीरिक शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते व शरीराचे नैसर्गिक सामर्थ्य वाढते.
शारीरिक शिक्षणामुळे शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते.
शारीरिक शिक्षणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
शारीरिक शिक्षण आपल्याला धैर्य शिकविते आणि आपले मन शांत करते.
शारीरिक शिक्षणामुळे मानसिक विकास होतो, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
शारीरिक शिक्षण व्यवसाय निवडीस मदत करते.
शारीरिक शिक्षणामुळे नेतृत्त्व गुण विकसित होतो.
शारीरिक शिक्षणामुळे व विविध क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्तीचा विकास होतो.
शारीरिक शिक्षणामुळे एकाग्रता वाढते.
शारीरिक शिक्षणामुळे उदार मनोवृत्तीचा विकास होतो.
शारीरिक शिक्षणामुळे शरीराबरोबरच मानसिक विकास होतो.
क्रीडा ही व्यक्तीची नैसर्गिक प्रवृत्ती असल्यामुळे विविध प्रकारच्या खेळांमुळे मन आनंदी होते व जीवनात नैराश्य येत नाही.
शारीरिक शिक्षणाद्वारे मानसिक शांती मिळू शकते.

