राष्ट्र उभारणीसाठी, देशाच्या भविष्यासाठी सढळ हाताने मदत करा... आपल्या अमूल्य मदतीमुळे एका विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलू शकते !
संस्थेचा उद्देश – महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा या भागामध्ये ऊस तोडणी कामगारांचे प्रमाण जास्त आहे याचे कारण ते दुष्काळग्रस्त भागातील भूमीहीन शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांना चांगले व उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे. सोबत देशातील इतर राज्यातूनही कामगारांची येणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा शिक्षण घेता यावे यासाठी हिंदी माध्यमाची शाळा सुरु करण्यात आली आहे. या मागची भुमिका व परिस्थिती :- महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्यातील ८०% लोक हे शेती व पशुपालन यावर अवलंबून आहेत. त्यामुळे यांच्याकडे उपजिवीका करण्याचे साधन हे फक्त रोजंदारीवर कामाला जाणे हेच आहे. मग ते वर्षातील ७ ते ८ महिने हे घरदार सोडून पश्चिम महाराष्ट्रात येतात व शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तोडणी करुन ते कारखान्यात जावूपर्यंत काम करत असतात. त्यावेळेस त्यांच्या सोबत त्यांची मुलेही येतात. गावी फक्त जेष्ठ नागरिक म्हणजे म्हातारे, कोतारे, वयस्कर लोक राहतात. त्यामुळे राज्यसरकारने १९६० मध्ये राज्य साखर कामगार महासंघाची स्थापना केली व कामगारांना संरक्षण दिले परंतू ते १९८० पर्यंत यावर काही पावले उचलली गेली नाहीत, फक्त स्थापना झाली परंतू त्यांचा रोजगार काही वाढविला नाही. त्यावेळेस मात्र या कामगारांनी संप पुकारला. त्यानंतर त्यांना रोजगार मिळाला मात्र शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करता आले नाही. यानंतर मधल्या काळात ..अधिक वाचा
आमचे विविध उपक्रम
आपण काय करु शकता ?
- इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य उदा. विट, वाळू, खडी, सिमेंट, स्टील, फरशी, प्लंबींग साहित्य, पत्रा, कंपाऊंड साहित्य इ. अनेकविध साहित्य उपलब्ध करुन देऊ शकता.
- वृक्षारोपणासाठी झाडे, अँगल, जाळी वैगेरे
- वर्गातील साहित्य फळा, बेंच, खुर्चा, टेबल, कपाट, कॅन, इलेक्ट्रीक साहित्य
- प्रयोगशाळेमध्ये उपयोगी होणारे साहित्य
- क्रिडा साहित्य
- ग्रंथालयासाठी पुस्तके, कपाटे इ.
- मुलांच्या जाण्या-येण्यासाठी स्कूल व्हॅन, स्कूल बस, अॅम्बुलन्स
- शालेय साहित्य : कपडे, बुट, मोजे, वह्या, पुस्तके, स्टेशनरी इ.
- ओव्हर हेड प्रोजेक्टर, कॉम्प्युटर, प्रिंटर, लॅपटॉप इ.
- कर्मचारांच्या पगारासाठी चेक, डीडी स्वरुपामध्ये मदत
- शाळेच्या मेंटेनन्ससाठी भरीव मदत
- आपल्या आईवडिलांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वर्ग खोली, एक विद्यार्थी शैक्षणिक खर्च
- अशा अनेकविध पद्धतीने आपल्या मदतीची अपेक्षा संस्थेला आहे. ज्या माध्यमातून अशा प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीने मागासलेल्या समाजातील मुलांच्या भविष्यासाठी संस्था भरीव कार्य करीत राहील. चला तर मग अशा मुला-मुलींचे उज्ज्वल भविष्य घडविण्यास सढळ हस्ते मदत करु या.

























